जिल्हास्तरीय विद्युत वितरण सनियंत्रण समितीवर ग्राहक प्रतिनिधी म्हणून सुमित समर्थ यांची निवड

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
मुल- महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण सनियंत्रण समिती जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या समितीत जिल्ह्यातील सर्व आमदार, जी.प.अध्यक्ष, विधान परिषद सदस्य, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, सी.इ.ओ.यांचेसह जिल्हास्तरीय विविध विभागाचे अधिकारी सदश व प्रतिनिधि असलेल्या २६ प्रतिनिधि मध्ये मुल येथील राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्ह्याचे सक्रिय व होतकरू कार्यकर्ते असलेले युवा नेते सुमित समर्थ यांची जिल्हा सदस्य पदी वीज वितरण क्षेत्र ग्राहक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्ह्यध्यक्ष बेबीताई उईके, रयत पतसंस्थेचे अध्यक्ष निमचंद शेरकी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाधर कुणघडकर, शहर अध्यक्ष अर्चना चावरे, प्रा.किसन वासाडे, महेश जेंगठे, गुरुदास गिरडकर,प्रशांत भरतकर, विनोद आंबटकर, दिनेश जिद्दीवार, अजय त्रिपत्तीवार,सुरज तोडसे,सोनल मडावी इत्यादींनी सुमित समर्थ यांचे अभिनंदन केले आहे.