“त्या ” कुटुूंबाला समाजातुन बहिष्क्रूत करणां-यावर पाेलिसांनी तातडीने कारवाई करावी – पटवारी विनाेद खाेब्रागडे
पळसगांव खुर्द येथील प्रकरण , पाेलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
आज आपला देश स्वातंत्र हाेवून ७५वर्षे पूर्ण झाली .भारतीय संविधानाने सर्वांनाच न्याय, हक्क, समता स्वतंत्रता बंधुता दिली आहे .हुकुम शाही नष्ट हाेवून लाेकशाही सुरु झाली .तरी पण बहिष्क्रूत सारखे प्रकरण घडणे हे उचीत नाही संबंधित पाेलिस स्टेशनच्या वरिष्ठ पाेलिस अधिका-यांनी तातडीने दखल घेत मेश्राम कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विदर्भातील नामवंत पटवारी विनाेद खाेब्रागडे यांनी नुकतीच केली आहे . चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यातील माैजा पळसगांव खुर्द येथील एका सर्व सामान्य कुटुंबातील चार व्यक्तिंना क्षुल्लक कारणास्तव बहिष्क्रूत केल्याची घटना काल सह्याद्री न्यूज नेट वर्कने सर्व प्रथम प्रकाशित केली हाेती .त्या अनुषंगाने विनाेद खाेब्रागडे यांनी ही मागणी केली आहे . अद्यापही हे कुटुंब आपणांस न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ कार्यालयांचे सातत्याने उंबरठे झिजवित आहे .परंतु हे व्रूत्त लिहीपर्यंत त्यांना याेग्य न्याय मिळाला नाही .सध्या हे कुटुंब समाजातुन बहिष्क्रूत आहे . या घटनेत जे काेणी दाेषी असेल त्यांचे वर रितसर कारवाई करावी अशी देखिल मागणी आता सर्व स्तरावरुन हाेवू लागली आहे .दरम्यान या बाबत नागपूरचे पाेलिस महासंचालक यांचे कडे.काल लेखी तक्रार दाखल करण्यांत आली असल्याचे महाराष्ट्रातील सुपरिचीत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या छबूबाई मेश्राम यांनी आज या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले .