युवकाने प्लाझ्मा देऊन रुग्णाचे जिव वाचविले

सय्यद मोहम्मद रेहान ने प्लाझ्मा रक्तदान करून एका रूग्णचा जिव वाचविण्यात यशवि ठरला..
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दि.25.04.2021रोजी एका वाॅटस ऐप वर संदेश वायरल झाला कि पुणे येथील रहाणारे रूग्ण मोहम्मद आरेफ सय्यद वय 35 वष॔ रा.सय्यद नगर पुणे यांना A+प्लाझ्मा रक्तदाता ची अत्यंत आवश्यकता आहे हे संदेश वाटस एप गुरप वर पाहून एक नव युवक सय्यद मोहम्मद रेहान वय 23 वषॆ रा.गुलजार काॅलोनी परभणी यास रहावले नाही व त्याने त्याचे वडिलांची परवानगी घेऊन रुग्णाचे नातेवाईक यांना आलेल्या संपर्क नंबर वर संपर्क केला व स्वतःचे खर्चाने 26.04.2021 रोजी पुणे गाठून प्लाझ्मा रक्तदान करून रुग्णाचे जिव वाचविण्यात यशस्वी ठरला त्याने दाखवलेल्या धाडसाचे आभार रूग्णाचे कुटुंब व नातेवाईकाने मानले तर सय्यद मोहम्मद रेहान यांचे वडील सय्यद खाजामिया सर लेक्चरार इन आरेबिक डॉ . जाकीर हुसैन जुनियर कॉलेज परभणी ,एकबाल कुरेशी(परभणी पोलिस),शेख मतिन मानवतकर, समीर पठाण, शेख वाशिम, शेख अझीम,अक्षय लॅब पुणे चे कर्मचारी दादा चिचकर, भरत सुरवसे यांनी सय्यद मोहम्मद रेहान खूप कौतुक केले व सय्यद मोहम्मद रेहान याने केलेल्या कार्या प्रमाणेच इतर कोरोना हून बरे झालेल्या नव युवकांनी प्लाझ्मा रक्तदान करून गरजु कोरोना रूग्णा ची मदत करून समाज कार्य करावे अशा संदेश सय्यद खाजामिया सर लेक्चरार इन आरेबिक डॉ . जाकीर हुसैन जुनियर कॉलेज परभणी यांनी दिला.