भव्य रोग निदान व मोफत औषधी वाटप

परभणी तालुक्यातील दैठणा येथे राष्ट्रवीर महाराणा प्रताप अहिल्याबाई होळकर गौतम बुद्ध वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रोग निदान व मोफत औषधी वाटप
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये 130 तज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदविला यामध्ये संभाजीनगर नांदेड लातूर मुंबई येथून तज्ञ डॉक्टर आले होते यामध्ये निरो सर्जन कर्करोग तज्ञ स्त्री रोग तज्ञ पोट विकार आर्थोपेडिक आय स्पेशालिस्ट कान घसा तज्ञ मनोविकार तज्ञ वोटिंग कार सर्जरी विभाग बालरोग तज्ञ त्वचारोग तज्ञ मुळव्याध आयुर्वेद रक्त विकार मामोग्राफी दंत रोग तज्ञ उपस्थित होते यावेळी 2200 रुग्णाची तपासणी करण्यात आली या महाआरोग्य शिबिराचे हे तेरावे वर्ष असून यावेळी कर्करोगावर तज्ञ डॉक्टरांनी विशेष मार्गदर्शन केले विशेष करून महिला करता तीस वर्षावरील सर्व महिलांनी वर्षातून एकदा कर्करोगाची तपासणी करावी असे आव्हान डॉ श्रीपाद कोसडीकर कर्करोग तज्ञ संभाजीनगर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून महिलांमधील कर्करोगाशी भीती दूर केली कर्करोग पहिल्या स्टेजमध्ये असल्यास ताबडतोब बरा होतो त्यामुळे कर्करोगाची तपासणी करून घ्यावी या महाआरोग्य शिबिरासाठी दैठणा येथील सोयसेवकांनी दोन दिवसापासून अहोरात्र मेहनत घेतली व हे शिबिर यशस्वी केले.