ताज्या घडामोडी

परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर येथे श्रीराम नवमी उत्सवाच्या आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात श्री साई स्मारक समिती पाथरीच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवार दिनांक 29 मार्च 2023 ते शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 या काळात श्रीरामनवमी उत्सव साजरा होत असल्याची माहिती समितीचे कार्यकारी विश्वस्त अॅड. श्री अतुलराव चौधरी यांनी दिली.
या महोत्सवा विषयी बोलताना चौधरी म्हणाले की, चैत्र शुद्ध नवमी श्रीप्रभूरामचंद्राचा जन्मदिवस म्हणून देशभरात साजरा केला जात असून, परमपूज्य श्री साईबाबांच्या हयातीत शिर्डी येथे साईबाबा “श्रीरामनवमी” हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असत, तीच परंपरा साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्री साई स्मारक समिती, पाथरीने मंदिर स्थापनेपासून मागील 23 वर्षापासून जोपासली आहे. यावर्षीही श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून उत्सवातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. पहाटे 5:15 वाजता श्री साईबाबांची काकड आरती, सकाळी 6:20 वाजता श्रींचे मंगल स्नान व दर्शन, सकाळी सात वाजता शिर्डी माझे पंढरपूर आरती व त्यानंतर श्रींची पाद्यपूजा, सकाळी आठ वाजता अभिषेक व विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व महाप्रसाद, सायंकाळी सहा वाजता श्रींची पाद्यपूजा, सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती नंतर पालखी मिरवणूक व हरिपाठ, सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या वेळेत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होईल, रात्री नऊ वाजता शेजारती होईल व नंतर मंदिर बंद होईल.

तसेच मुख्यत्वेकरून बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी पहाटे 5:45 वाजता श्रींच्या फोटोची व श्री साईसच्चरित्र ग्रंथाची मंदिर ते द्वारकामाई मिरवणूक निघेल व मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर अखंड श्री साईसच्चरित्र पारायणास प्रारंभ होईल, दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत श्री ह भ प सर्वेश महाराज शुक्ला हिंगोलीकर, यांची कीर्तन सेवा, गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी पहाटे 5:45 वाजता श्री साईसच्चरित्र पारायणाची समाप्ती होईल व श्रींच्या फोटोची व श्रीसाईसच्चरित्र ग्रंथाची द्वारकामाई ते मंदिर अशी मिरवणूक निघेल, सकाळी नऊ वाजता धूनी पूजा, सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत श्री ह भ प सर्वेश महाराज शुक्ला हिंगोलीकर, यांची श्रीरामनवमी विशेष कीर्तन सेवा होईल, त्यानंतर अॅड.श्री. मुकुंदराव चौधरी यांनी देणगी दिलेल्या गव्हाच्या पोत्याचे द्वारकामाई येथे त्यांचे शुभ हस्ते पूजन होईल, नंतर श्री सूर्यभान तुळशीरामजी सांगडे, मुख्य प्रवर्तक संस्थापक सदस्य तथा कोषाध्यक्ष विश्वस्त यांचे शुभहस्ते त्यांचे निशाणाचे पूजन व निशाण मंदिराचे शिखरावर उभारले जाईल, सायंकाळी 4:30 वाजता श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक निघेल. आणि सांगता दिवशी शुक्रवार दि. 31 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री ह भ प सर्वेश महाराज शुक्ला हिंगोलीकर, यांची गोपाळकाल्याच्या कीर्तनाची सेवा होईल व त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. ज्या साई भक्तांना अखंड पारायणात सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी आपली नावे दिनांक 28 मार्च 2023 पूर्वी श्री सुधाकर नारायण बेदरे (मो.7559134128) यांच्याकडे समक्ष किंवा फोन वरून नोंदवावीत. अशी माहिती समितीचे कार्यकारी विश्वस्त अॅड. श्री अतुलराव चौधरी यांनी दिली .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close