शेख अनवर शेख रुस्तुम यांची मानवत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
समाजसेवक शेख अनवर शेख रुस्तुम यांची मानवत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अजीत दादा गट तालुकाध्यक्ष पदी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यां उपस्थितीत निवड दि.३० डिसेंबर करण्यात आली .काहि दिवसापुर्विच अजितदादा पवार यांना मुंबई येथे भेटुन शेख अनवर यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता .
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. सुरज चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या तालुकाध्यक्ष पदी आपली नियुक्ती करण्यात येत असून आपण पक्षाचा अधिक विस्तार करून उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांचे विचार तळगाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल, पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो या आशयाचे पञ रोहन सामाले पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी यांच्यां वतीने देण्यात आले आहे.शेख अनवर यांच्यां निवडिचे सर्व स्तरावरुन स्वागत होत असुन त्यांना शुभेच्छा मिळत आहे .यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी , रोहण सामाले यांच्यांसह मानवत तालुक्यातील युवक व राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. समाजसेवक शेख अनवर यांना युवक तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी भेटल्याने मानवत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळणार हे माञ नक्की आहे.