ताज्या घडामोडी

पोलीस मित्र परिवार समन्वय समिताचा आगळा-वेगळा उपक्रम

वाढदिवसा निमित्त गरजु विधवा महिलांना शिलाई मशीन भेट देऊन केला वाढदिवस साजरा…

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगांव येथे दि.१/७/२०२२ ला पोलीस मित्र परिवार समन्वय समिती चे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संघपालजी उमरे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.सर्व प्रथम सर्व पाहुण्यांच्या उपस्थित केक कापण्यात आला.वाढदिवसा निमित्त पोलीस अधिकारी व महामार्ग पोलीस अधिकारी व समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान पञ, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत कुंटुबियांच्या उदर निर्वाहासाठी हातमजुरी शिवाय आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही स्ञोत नसलेल्या विधवा महिला साधना अंकुश बन्सोड रा. तुळजापूर यांना आयुष्य जगण्यासाठी आधार म्हणुन शिलाई मशीन भेट देण्यात आली.याप्रसंगी मान्यवरांनी वाढदिवसा निमित्त व समाजपयोगी मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला प्रामुख्याने मा.डॉ.संघपालजी उमरे सर संस्थापक अध्यक्ष पो.मि. प.समन्वय समिती महाराष्ट्र राज्य,मा.हेमंतजी चौधरी पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे. तळेगाव दशा.,मा.राजेंद्रजी वासुकर,पी.एस.आय. वाहतूक महामार्ग, करंजी,मा.संतोषजी जंगले पी.एस.आय.वाहतूक महामार्ग देवगांव,मा.वनिताताई राऊत सरपंचा देवगांव ग्रा.पं.,मा. सीमाताई उमरे,मा. मनिषभाऊ गुडधे विभागीय प्रमुख अमरावती जिल्हा, मा.रवि ससनकर तंटामुक्ती अध्यक्ष देवगाव,मा.राजेंद्रजी तांबेकर,जिल्हा महासचिव अमरावती जिल्हा,मा.सम्यक उमरे विदर्भ युवा सचिव,मा.बाबारावजी इंगोले तालुका प्रमुख धामणगाव रेल्वे,मा. प्रशांत नाईक तालुका प्रसिद्धी प्रमुख व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती चे अमरावती विभागातील व धामणगांव रेल्वे तालुक्यातील सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश गाडेकर पो.मि.प.स.समिती कमांडो, शुभम डेबे,अमोल कोवळे,पकंज जुमळे,अश्विनी चौधरी,नंदिनी चौधरी,विजय रुपवणे,अनिल चौधरी,संदिप भगत,दिपकराव बनकर,हेमंत मोरे,उमेश दुर्गे,अनिल बहादुरे,संतोष मोटघरे,कैलाश लोखंडे,व धामणगाव तालुक्यातील सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती च्या पदधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.समितीने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कैतुक केले जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close