लाकडी दांडक्याने मारहाण करून कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथे एकाचा खून
खुन प्रकरणी उंब्रज पोलिसांनी केली एकाला अटक
प्रतिनिधीः प्रमोद राऊत कराड
कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथे एकाचा खून..शिव्या दिल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करणाऱ्या एकाला उंब्रज पोलिसांनी केली अटक.. सोमवारी रात्री घडला खूनाचा प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड राज्यातील सध्या कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथे राहणाऱ्या अजय भागवत पटेल याने राजपाल नारायण पटेल याला शिव्या दिल्याच्या कारणावरून दिनांक 13 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास दांडक्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात डोळ्यावर पाठीवर मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केला.. तसेच बाजूलाच राहणाऱ्या रवींद्र कुमार पटेल याला दांडके उभारून मै राजपाल को मार डालूंगा..तुम पोलीस केस करो या कुछ भी करो..तुमने किसी को बताया तो मै तुम्हे बी मार डालूंगा अशी जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद रवींद्र कुमार पटेल यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली या खून प्रकरणी उंब्रज पोलिसांनी अजय भागवत पटेल वय 21 राज्य छत्तीसगड सध्या राहणार भोसलेवाडी याला अटक केली आहे या खुनाबाबतचा अधिक तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरे करीत आहेत .