राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे दत्तात्रय समर्थ यांनी दिले निवेदन ; केली चौकशीची मागणी
शिवणी वनविभागातील प्रकरण
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्या अंतर्गत येत असलेल्या शिवणी वनपरिक्षेत्रातील रोखलेखा खर्च प्रमाणकेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा औद्योगिक काँग्रेस सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.
दरम्यान समर्थ यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे एक लेखी निवेदन सादर केले आहे.शिवनी येथील मुरलीधर गायकवाड यांनी समर्थ यांचे कडे सदरहु तक्रार सादर केली होती.त्या अनुषंगाने समर्थ यांनी चौकशीची मागणी केली आहे.उपरोक्त प्रकरणात सखोल चौकशी केल्यास गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांचे म्हणणे आहे.या बाबतीत त्यांनी देखील वरिष्ठांकडे तक्रार दाखल केलेली आहे.