ताज्या घडामोडी
संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती खानापूर फाटा येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने परभणी शहरांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व शिव शंभूप्रेमींच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून *डॉक्टर निलेश दळवे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख , जिल्हाप्रमुख बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, मराठा सेवा संघाचे सुभाष ढगे, विशाल जावळे,सखाराम रणेर, सचिन आवरगंड, नितीन महाराज जाधव, तुळशीराम दळवे सर, बाळकृष्ण शिंदे भारत जोगदंड ऋषी चापके प्रकाश आहेर, महेश नरहीरे, ज्ञानेश्वर दुधाटे, ओमकार दुजारे , सुमित सावते यांच्यासह अनेक जणांची उपस्थिती होती