राष्ट्रभक्तीने ओतप्रोत व समाजसेवेचे व्रत स्विकारलेला कार्यकर्ता हीच भाजपाची शक्ती – संजय गजपुरे
भाजपा स्थापनादिनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार व वृध्दांना बांबु आधारकाठीचे वितरण
कोर्धा ता. नागभीड येथे भाजपा स्थापनादिन उत्साहात संपन्न.
तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
भाजपाचा ४३ वा स्थापनादिवस नागभीड तालुक्यातील कोर्धा येथे चंद्रपुर जिल्हा भाजपा संघटन महामंत्री व माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे व ज्येष्ठ कार्यकर्ते वासुदेवरावजी जिवतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी व अंत्योदयाचे जनक दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
राष्ट्रभक्तीने ओतप्रोत विचारधारेशी एकनिष्ठ राहत व समाजसेवेचे व्रत स्विकारलेला कार्यकर्ता हीच भाजपाची शक्ती असुन राष्ट्रसेवा , समाजसेवा व धर्मरक्षा या पक्षाच्या तत्वासाठी आयुष्य समर्पित केलेल्या कार्यकर्त्यांचा पक्षाला सार्थ अभिमान आहे. अशा देवदुर्लभ कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच आज भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष बनला असल्याचे प्रतिपादन संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केले. सध्या भाजपाची वाटचाल ही सेवा , समर्पण व अंत्योदयाचे व्रत बाळगून देशाच्या व जनतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी सुरु असुन पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कोर्धा येथील पक्ष स्थापनेपासुन कार्य केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी संजय गजपुरे यांच्या वतीने वृध्दांना बांबु आधार काठीचे वितरण करण्यात आले . तसेच गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांच्या वार्षिक दिनदर्शिकेचे वाटप उपस्थितांना करण्यात आले. सोबतच भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख विजय खोब्रागडे व बुथ प्रमुख श्रावण जिवतोडे यांचा सत्कार भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी केला व बुथ सशक्तीकरण अभियान ताकदीने पुर्ण करण्याचा संकल्प उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
या कार्यक्रमाला माजी पं. स. सभापती सौ. अल्काताई जिवतोडे , उपसरपंच दिनेश चौधरी , ग्रा.पं. सदस्य विलास चौधरी व हरीदास नवघडे , कृऊबास संचालक मनोहर चौधरी , ज्येष्ठ कार्यकर्ता यशवंत निकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन शंकर मशाखेत्री यांनी केले तर आभार विजय खोब्रागडे यांनी मानले.