ताज्या घडामोडी
158 गैरहजर मतदान अधिकाऱ्यांना प्रशासनाचे कारणे दाखवा नोटीस

पहिल्या प्रशिक्षणात गैरहजर असल्याने नवनियुक्त मतदान अधिकाऱ्यां साठी पहिले प्रशिक्षण संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामासाठी मतदान अधिकारी म्हणून निवडणूक विभागाने 2088 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती त्यांचे पहिले प्रशिक्षण 27 ऑक्टोबर 24 रोजी घेण्यात आले होते. परंतु सदर प्रशिक्षणात 158 मतदान अधिकारी गैरहजर होते त्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजवल्या पाथरी मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेता 18 मतदान अधिकारी यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली त्यांना तहसील कार्यालय पाथरी येथे पहिले प्रशिक्षण श्री शंकर हांदेशवार तहसीलदार पाथरी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थित देण्यात आले यावेळी वसंत महाजन नायब तहसीलदार निवडणूक पाथरी व इतर कर्मचारी उपस्थित होते .