स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती विद्यालयात सुंदर उपक्रम

प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
लाखणी तालुक्यातील पालांदुर चौ येथील सरस्वती विद्यालयात देशाच्या स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित विद्यार्थ्यांमध्य देशभक्ती , देशाभिमान,देशप्रेम रुजावा ,त्यांना थोरांचे व क्रांतिकारकांचे देशासाठी योगदान याची प्रेरणा मिळावी या हेतूने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यामध्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्ती गीते सादर केलीत .त्यांच्या भाषणातून स्वातंत्र्याचा ज्वलंत इतिहास उभा केला.
विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख व उपक्रमशील शिक्षक हरिश्चंद्र लाडे यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. ए. सय्यद होते.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नामदेव गिर्हेपूजे, ईश्वर हटवार, ,स्वीटी चव्हाण आणि जयश्री हटवार उपस्थित होते.प्रमुख अतिथीनी थोरपुरुष व क्रांतिकारक यांच्या जीवन कार्यावर त्यांच्या भाषणातून प्रकाश टाकला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले जनरल बिपीन रावत आणि अन्य मृत 12 लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली .
संचालन व प्रस्ताविक हरिश्चंद्र लाडे यांनी केले.आभारप्रदर्शन पुष्कर बावणे याने केले.