श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात अमेरिका स्थित साईभक्तांचा प.पू. श्रीसाईबाबांना महाभिषेक

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कॅलिफोर्निया, अमेरिका स्थित साईभक्त सुयोग विश्वनाथ कुलकर्णी व परिवाराने प.पू. श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर, पाथरी येथे मोठ्या श्रद्धेने साईबाबांच्या मूर्तीला महाभिषेक व महानैवैद्य केला. श्री.विश्वनाथ कुलकर्णी, सौ. मंगला विश्वनाथ कुलकर्णी, प्रकाश चंद्रात्रे, योगिनी चंद्रात्रे, अनिल चंद्रात्रे, सौ. अर्चना चंद्रात्रे यांनीही प.पू.श्रीसाईबाबांना महाभिषेक केला.
अभिषेकाचे पौरोहित्य योगेश गुरु इनामदार, वाळूजकर शास्त्री यांनी केले. अभिषेका नंतर श्रीसाई स्मारक समिती पाथरीच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने यजमानांचा शाल, श्रीफळ, उदीप्रसाद देऊन मंदिर प्रमुख सौ.छाया कुलकर्णी यांनी यथोचित आदर सत्कार केला. अभिषेक सोहळा व्यवस्थित पार पाडणे कामी प्रभाकर पाटील, मोहन महाराज पोपळघट, कलाबाई कांबळे, कमलबाई तेलंगे, सौ सुजाता भास्कर डहाळे, यांनी विशेष परिश्रम घेतले.
अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एन.के. कुलकर्णी यांनी दिली.