नेरी – चिमुर रोडवर अपघात ओव्हरटेकच्या नादात झाला अपघात दोन गंभीर जखमी
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
नेरी – चिमुर रोडचे रूंदीकरणाचे काम चालु असुन चिमुरला जात असतानी प्रवाशांनी भरलेल्या तीन चाकी ऑटोला स्कॉर्पीओ गाडीने ओव्हरटेक करीत असतानी हा अपघात कळमगांव जवळ २६ फेब्रुवारीला दुपारी ११ वाजता घडली .
नेरी – चिमुर रोडनी वाहतुक मोठ्या प्रमाणात चालत असतो .आणी त्यातच या रोडचे रूंदीकरणाचे काम सुध्दा चालु आहे . चिमुरला जात असलेल्या प्रवाशांनी भरलेल्या तीन चाकी ऑटोला स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच. – ३१ ,डीके .-५२४९ या वाहनाने ओव्हरटेक करीत असतानी ऑटोला घासत नेवुन तोल ऑटोचा बीघडवला व त्यामुळे ऑटोतील नेरी येथील रहीवासी इब्राहीम शेख वय – ५५ वर्ष या प्रवाशाला व ऑटो चालक वीनायक वैरागडे हे गंभीर जखमी झाले आहेत. ही स्कॉर्पीओ चीमुर येथील पटेल यांची आहे .
पुढील उपचारासाठी उपजील्हा रूग्णालय चिमुर येथे गंभीर जखमीना पाठवीण्यात आले .
या घटनेची माहीती पोलीस वीभागाला होताच पोलीस घटना स्थळी पोहचले .व पंचनामा करुन पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे .