ताज्या घडामोडी

अखेर भिसी येथील आरोग्य सहाय्यीका कराडे यांचे निलंबन मागे

डॉ.प्रियंका कष्टी यांची वासेरा येथे बदली

तालुक्यातील आरोग्य सेवा होणार सुरळीत

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमूर

भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य सहाय्यीका शिला कराडे यांना निलंबीत करण्यात आले.हे निलंबन मागे घेण्याच्या मागणी करीता महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका चिमूर यांच्या २२ ऑक्टोंबर पासून कामबंद आंदोलन पुकारले.ज्यामूळे तालुक्यातील आरोग्य सेवा कोळमडली.अखेर २९ आक्टोंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद चंद्रपुर यांनी उशीरा रात्रो निलंबन मागे घेत असल्याचे तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ. कष्टी यांच्या बदलीचे आदेश काढले.
आरोग्य क्षेत्रात खळबळ माजविणारे भिसी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील २७०० कोरोणा प्रतिबंध लसी गोठल्या प्रकरणीआरोग्य विभागात खळबळ माजली.मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांनी या प्रकरणास जबाबदार धरुण आरोग्य सहाय्यीका शिला कराडे यांना २० आक्टोबंरला निलंबीत केले.मात्र हि अन्याय कारक आणी एकतर्फी कार्यवाही असल्याचा आरोप करीत कराडे यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणी करीता आरोग्य सेवा कर्मचार्‍यांनी २२ आक्टोबंरला कामबंद आंदोलन पुकारले.ज्यामूळे तालुक्यातील आरोग्य सेवा कोळमडली.मात्र तरीही आंदोलनाची पाहीजे तशी दखल घेतली नाही उलट २४ तासात कामावर रुजु व्हा अन्यथा साथ रोग प्रतिबंध कायद्या नुसार कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला.
२८ आक्टोबंरला जिल्हा परीषद चंद्रपूर पुढे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी संघटना एकवटून संघर्ष कृती समीतीच्या माध्यमातुन एक दिवसीय धरणे आंदोलन केले.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कोरोणा प्रतिबंधक लसीकरण तथा सामान्य नागरीकांच्या आरोग्य सेवेवर परीणाम झाला.अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रात्रो उशीरा आरोग्य सहाय्यीका शिला कराडे यांचे निलंबन मागे घेतल्याचा आदेश काढला.ज्यात विभागीय चौकशी होई पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे पदस्थापना केल्याचे नमुद आहे.तर डॉ.प्रियंका कष्टी यांची प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा येथे बदली केली असुन त्यांचे जागेवर वैद्यकिय अधिकारी म्हणुन डॉ.कुंदन बावनकुडे यांचे कडे पदभार सोपविण्याचे आदेश काढले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close