ताज्या घडामोडी

पोलीस मिञ परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार यांचे माणुसकीचे दर्शन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

अमरावती दि.११/४/२०२२ : पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार श्री सुभाष सोळंके व त्यांचे कुटुंबीय पत्नी सौ.शोभा सुभाष सोळंके,मुलगा राहुल सुभाष सोळंके,मुलगी सौ.स्मिता राहुल सोळुंके व नातू शिवांश सिंह राहुल सोळुंके छोटा पोलीस मित्र हे सहकुटुंब धार्मिक विधी आटपून दिनांक ११/४/२०२२ ला अमरावतीला येत असतांना रात्री अंदाजे ९:३० चे सुमारास अमरावती दर्यापूर मार्गावर चार ते पाच किलोमीटर पुढे रस्त्याचे बाजूला एक दुचाकी वाहनासह एक तरुण मुलगा वय अंदाजे २७ वर्ष रक्ताच्या थारोळ्यात माखलेल्या अवस्थेत पडून असलेला आढळला.श्री सुभाष सोळंके मुख्य सल्लागार व त्यांचे कुटुंबाने कोणत्याही प्रकारे विचार न करता त्या मुलाला आपल्या चारचाकी वाहनांमध्ये अमरावती येथील शासकीय रूग्णालयात भरती केले. व त्यांचे कुटुबियांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले त्यांचे कुटुबियांतील व्यक्ती येईपर्यंत सहकुटुंब रुग्णालयातच थांबले.त्यांचे कुटुबियांतील व्यक्ती आल्यावर त्यास आंतररुग्ण म्हणून दाखल केले.
ह्या सर्व घडामोडी होईपर्यंत आम्ही त्यास त्याचे नाव व इतर माहिती कोणतीही माहिती नव्हती. चौकशी केल्यानंतर त्याचे नाव मोहम्मद जलील अहमद आई नाही वडिल रिक्षा चालक आहे असे कळले.त्यांचे नातलग आल्यानंतर आम्ही त्यास त्यांच्या ताब्यात देऊन आम्ही सर्व कुटुबिंय रात्री साडे अकराच्या पुढे घरी पोहचलो.
आम्ही हिंदू धर्माप्रमाणे आमचा धार्मिक विधी आटोपून घरी येत होतो.यामध्ये आम्ही त्या मुलाची जात व धर्म न विचारता आम्हास शक्य झाल ती मदत केली.गरजेच्या वेळी जात बघितली जात नाही बघितले जाते फक्त माणुसकी ती माणुसकी फक्त-नी-फक्त पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या सर्व पदधिकाऱ्यांन मध्ये आहे. ती माणुसकी कोणत्याही लहान-मोठ्या समस्यासाठी नेहमीच दाखविण्यात येते व आता ही तसीच माणुसकी दाखविण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close