श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात नुतन इमारत पायाभरणी व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव- येथील श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये गुणवत्ता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच नुतन इमारतचा पायाभरणी समारंभ दि ८ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, प्रमुख अतिथी उपेंद्र कुलकर्णी ( सेवाप्रमुख- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम क्षेत्र), डॉ विक्रमजी सारुक (शिक्षणाधिकारी मा. बीड), नितीन शेटे (कार्यवाह- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था), राधेश्याम लोहिया (उपाध्यक्ष- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था), प्रा चंद्रकांत मुळे (सहकार्यवाह- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व नुतन इमारतीच्या पायाभरणी समारंभास गुणवंत विद्यार्थी, पालक, संकुलाचे माजी विद्यार्थी, पत्रकार,प्रतिष्ठित नागरिक आदिंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक सुनील लोढा, अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, अभय कोकड, प्रेमकिशोर मानधने, अॅड विश्वास जोशी, तेजस महाजन, जगदीश साखरे, प्राचार्य डॉ महेश देशमुख, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, मुख्याध्यापक प्रदीप जोशी, सीबीएसई च्या प्राचार्या सौ वंदना मिटकरी आदिंनी केले आहे.