ताज्या घडामोडी

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या निषेधार्थ शनिवारी मानवत बंदची हाक

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

महापुरुषांची बदनामी करणारे भगतसिंग कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी पदावरून त्वरित हटवावे यासह विविध मागण्यांसाठी शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने शनिवार १७ डिसेंबर रोजी मानवत बंदची हाक देण्यात आली आहे या संदर्भात बुधवारी १४ डिसेंबर रोजी मानवत तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.महापुरुषांची बदनामी करणारे चंद्रकांत पाटील सुधांश त्रिवेदी मंगल प्रभात लोंढा प्रसाद लाड यांच्यावर कठोर कार्यवाही करावी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक करणाऱ्या मनोज गरबडे यांच्यावर लावलेली जाचक कलमे रद्द करून या घटनेस जबाबदार असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा चित्रपटाच्या माध्यमातून महापुरुषांची होणारी बदनामी बदनामी थांबविण्यात यावी व ज्या चित्रपटात महापुरुषांची बदनामी करण्यात आली आहे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत महापुरुषाबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करण्यासाठी कायदा करण्यात यावा या मागण्यांसाठी शनिवारी १७ डिसेंबर रोजी मानवत बंदची हाक हा देण्यात आली आहे यामध्ये शाळा महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात येणार आहेत या संदर्भात तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निवेदन पाठवण्यात आले आहे यावेळी गोविंद घांडगे, आनंद भदर्गे, ज्ञानेश्वर चांगभले, राजकुमार खरात, अनिल जाधव, राजेभाऊ होगे,महेंद्र ठेंगे, अमीर अन्सारी, मुरलीधर ठोंबरे, दीपक ठेंगे,बालाजी टाक, नागसेन भदर्गे, रवी पंडित, धनंजय काळे, व्यंकटेश चौधरी, दत्तराव चौधरी, नंदकिशोर कुमावत,संपत पंडित, मो. मुस्ताक मो.अक्रम शेख, हनुमान नांदुरे, छगन भदर्गे, दशरथ शिंदे, विलास पतंगे, संतोष सोरेकर, जनार्दन कीर्तने, विश्वनाथ तुरे, रामेश्वर काष्टे, ज्ञानेश्वर पानझडे, बालाजी बिडवे, हनुमान काळे, रवी चव्हाण यांच्यासह शिव,फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close