ताज्या घडामोडी

30 वर्षांनी अनुभवला मित्रांनींच मित्रांचा सहवास

अनेक जुण्या आठवणींना दिला उजाळा

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

गत 30 वर्षांपूर्वी येथील नवभारत विद्यालयात( इयत्ता दहावीत) शिकणारे वर्गमित्र नजिकच्या सोमनाथ येथे एकमेकांच्या भेटीसाठी एकत्रित झाले .त्या वेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.


प्राथमिक शिक्षणासोबतच माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या सतीश मुत्यालवार,अशोक गगपल्लीवार,संजय खानोरकर,राजेश साखरकर,अविनाश चिलके,गणेश रामशेट्टीवार,जितेंद्र तंगडपल्लीवार,विक्की टहलियानी आदिंनी सर्व मित्रांना एकत्रित आणण्याची संकल्पना आखली अर्थातच त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले. दि. 17 मार्चला रमेश माहूरपवार,फारुख शेख,उमेश पटेल,राम खियानी,प्रवीण गोयल,जितेंद्र अग्रवाल,सिकंदर लेनगुरे,संतोष वाढई,जावेद शेख,रवी केशवाणी,सचिन पुल्लावार,मुकेश गोवर्धन,मनोज कावळे,रोशन नरुले,प्रशांत समर्थ,सत्यवान दिवटे,संघपाल उराडे,राकेश भुमनवार,दीपक कुंदोजवार,राजेश ठाकरे,संतोष घाटे,संजय मेश्राम,मोरेश्वर लोनबले,कुमार दुधे,तारकेश येलोरे,प्रवीण रोहणकर,किशोर भोयर,संजय भोयर,विजय कामनपल्लीवार,गुलशन टहलियानी,संजय जिवतोडे,मारोती नागापुरे,हेमचंद डांगे,अतुल बुरांडे,विनोद बुक्कावार,बरकत सय्यद,संजय आगडे,विजय दुर्गे,प्रमोद कोकुलवार,किशोर मोहुर्ले,मनोज गुज्जनवार,जितेंद्र नागोशे,मधुकर पोहणकर,संजय गावातूरे,डॉ. युवराज घोसेकर,गणेश चीटलोजवार,संजय ठाकरे,मदन अडवाणी,अमोल् गुलभमवार हे सर्व 1994 च्या बॅचचे सर्व मित्र आपल्या जुण्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येथील नवभारत विद्यालयाच्या परिसरात एकत्रित आले. यानंतर सोमनाथ येथे भोजनाचा एक छोटाखानी कार्यक्रम पार पडला. वर्गमित्र असलेले आणि नागपूर येथ वैद्यकिय सेवा देणारे डॉ.सुशील वैरागडे यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना जुण्या आठवणीतील काही गंमतीजमती सांगितल्या. हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मित्रांना धन्यवाद देताना वैद्यकिय सल्ला देत ,मी मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याची त्यांनी या वेळी सर्वांसमक्ष ग्वाही दिली. सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रांत रोजगार करून आपल्या कुटुंबांची जबाबदारी संभाळणाऱ्या सर्वच मित्रांनी आपआपला परिचय देऊन मनोगत व्यक्त केले. भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतल्यावर परत भेटण्याची इच्छा व्यक्त करीत सर्वांच्या स्मरणात राहणा-या या भेट कार्यक्रमाची सांगता झाली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close