राजूराच्या सुपरिचित चित्रकार रश्मि पचारे ठरल्या सन्मान पुरस्काराच्या मानकरी
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील मुळ रहिवाशी असलेली सध्या सोलापूरात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी सुपरिचित चित्रकार रश्मि पचारे यांना मूल मुक्कामी शनिवारी झालेल्या शानदार एका पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे प्रथमच राष्ट्रीय लोकहित सेवाने हा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. पुरस्कार प्राप्त रश्मिचे सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी अभिनंदन केले आहे .या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे, मूलच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या अर्चना चावरे, चंद्रपूरच्या सुपरिचित अधिवक्ता पुनम वाघमारे, उपराजधानी नागपूरातील कर्जमुक्ती अभियानाच्या गिता मेहर या शिवाय चंद्रपूर शहरातील नामवंत कवयित्री सविता कोट्टी -सातपूते, सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, मूलच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या अर्चना समर्थ, समता बन्सोड, औद्योगिक भद्रावती नगरीच्या व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या कु. किरण साळवी, कु.उज्वला निमगडे, समता बन्सोड व अर्चना चावरे उपस्थित होत्या.