ताज्या घडामोडी

बोळधा येथील वनविभागाचे मिश्र रोपवन आगीत जळून खाक


कक्ष क्र 424 मधील 20 हेक्टर जागेवरील 22000 हजार रोपे आगीत भस्म

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या बोळधा येथील वनविभागाचे मिश रोपण वणवा च्या आगीत जळुन खाक झाला हा रोपण शिवनपायली या गावाला लागून असून 20 हेक्टर मध्ये लावलेला होता आग इतकी भयानक होती की रोपण जाळून लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधा पर्यन्त पोहचला परंतु शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही.
सण 2019 ला वनविभाग ब्रम्हपुरी अंतर्गत, वनपरिक्षेत्र तळोधी(प्रादेशिक), उपक्षेत्र , नेरी निमक्षेत्र बोळधा कक्ष क्र 424 येथे राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात 20 हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले दोन रोपांचे अंतर 3 x3 मी एवढे होते या रोपवणात एकूण 22 हजार अनेक प्रजातीचे रोपे लावण्यात आले होते परंतु दि 16 फेब्रुवारी ला दुपारी 12 वाजता लागलेल्या आगीमध्ये वाऱ्याच्या झुळकी संपुर्ण रोपवन आगीच्या कवेत आले आणि संपुर्ण रोपवन आगीत जाळून खाक झाले तसेच या रोपवणात असलेले तत्सम प्रकारची अनेक झाडे आणि वनस्पतींची जळुन नष्ट झाली.
ही आग कशी लागली याची सविस्तर माहिती मिळाली नसली तरी पण शिवनपायली येथील गावकऱ्यांनी या आगीबद्दल सांगितले की वनविभागाचे रोजनदारी मजूर हे रोपवणाच्या सुरक्षा करण्यासाठी रोपवणाच्या सर्व बॉर्डर वर कचरा साफ करून पेटवित होते त्यामागील उद्देश असा की जर शेतकऱ्यांनी शेतात आग लावली तर ती रोपवणात येऊ नये आणि रोपवणाची सुरक्षा व्हावी परंतु ही आग वनविभागाचे मजूर लावीत असताना दखल घेऊन काम करायला पाहिजे होते असे गावकऱ्यांनी सांगितले होते दि 16 फ्रेब्रु ला मजुरांनी आग लावली आणि आंब्याच्या झाडात जेवायला बसले काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण रोपवणाच्या परिसराला कवेत घेतले मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात आली नाही यात लाखो रुपयांचा शासनाचा नुकसान झाला असून संपुर्ण रोपवन जळुन खाक झाला.
शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी करोडो रुपये खर्च करीत असते जंगलाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी व पर्यावरण चा समतोल साधण्यासाठी झाडे लावा प्रत्येक घरी झाडे लावण्यावर अनेक योजना राबवित असते व करोडो रुपयाचा खर्च करीत असते परंतु वनविभागा च्या मजुरांच्या अशा निष्काळजीपणा मुले संपुर्ण रोपवन उदवस्त होऊन लाखो रुपयांचा चुराडा होत असेल तर काय होईल असे प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे या रोपवना ला लागलेल्या आगीत कोण दोषी आहे याची वन विभागाने चौकशी करून सबंधितावर कारवाई करावी अशी मागणी शिवनपायली आणि परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close