ताज्या घडामोडी

बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे परभणी लोकसभा समन्वयक पाथरी तालुक्याचे माजी आमदार लोकनेते हरिभाऊ काका लहाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दि 18 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता होणार आहे .या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास शिवसेनेचे संपर्कप्रमुख मा खा. सुरेशराव जाधव, सहसंपर्कप्रमुख भास्करराव लंगोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे , उपजिल्हाप्रमुख केशवराव कदम हे उपस्थित राहणार आहेत या उद्घाटन समारंभास पाथरी सोनपेठ सेलू मानवत तालुक्यातील शिवसैनिक व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्रमुख गोविंद गायकवाड ,पाथरी शहरप्रमुख चक्रधर चिंचाने .युवा शहरप्रमुख मुस्तफा अन्सारी. पाथरी तालुका कार्याध्यक्ष भागवत शेळके तालुकाप्रमुख सुधाकर गोंगे, कर्ण वाकणकर ,जय गिराम, अमोल घुमरे कर्ण घुमरे ,बाबा टेकाळे, फुलचंद टेकाळे यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close