थकबाकीदारांची वीजखुशाल कापा, आधी सूचना तर द्या-अभिजीत कुडे

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वीज पुरवठा खुशाल खंडित करा पण त्याची ग्राहकांना पूर्वसूचना द्या अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे विद्युत विभागाकडे करन्यात आली.
कोविड १९ कोरोना च्या या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण भारत बंद असल्यामुळे गरीब जनतेची पिळवणूक झालेली आहे यात कोणतेही सुधारणा झाली नाही . विद्युत विभागाची परिस्तिथी फार हलाखीची आहे बरेच लोकं बेरोजगार झाले आहे. अश्या परिस्थितीत काहींनी विज देयक भरलेले नाही . त्या ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचा विज पुरवठा खंडित केला जातो. ग्रामीण भागातील नागरिक दुपारी सगळे शेतात असताना कोणीच घरी नसताना त्यांचा वीज पुरवठा खंडित केला जातो व त्यानंतर पुन्हा वीज पुरवठा जोडणीस वेळ लागत असल्यामुळे त्यांना विज पुरवठा खंडित करण्याआधी पूर्वसूचना द्या अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे यांनी विद्युत विभागाकडे निवेदनाव्दारे केली यावेळी न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे सचिव रोशन भोयर उपस्थित होते.