राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( दिव्यांग सेल) वरोरा ची बैठक संपन्न

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नुकतीच वरोरा येथील सिद्धकला लॉन येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा करणेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सोबतच वरोरा तालुक्यातील सर्व शहरी तथा ग्रामीण भागात दिव्यांग यांना सोबत घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. दिव्यांगाना अनेक अडचणी असून त्या सोडविण्याच्या दृष्टीने नगरपालिका,तहसील कार्यालय, पंचायत समिती येथे दिव्यांग याच्या समस्या व विविध मागण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून निवेदन देऊ न दिव्यांग बांधवांना व भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी जाहीर केले. व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष (दिव्यांग सेल) राजेंद्रजी ताजने सर यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ताजने, वरोरा तालुका अध्यक्ष अभय पिंपळकर, ग्यानीवंत गेडाम तालुका उपाध्यक्ष वरोरा, रूपाली चिंचोलकर महिला तालुका अध्यक्ष वरोरा, वरोरा शहराध्यक्ष विकास ढगे, सचिव बबलू शेख, नामदेव कुळमेथे, अंकुश उके, श्रीकांत वराडे व अनेक कार्यकर्त्यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.