जन्मस्थान मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे दिनांक 12 जुलै 2022 रोजी प्रारंभ झालेल्या श्री गुरु पौर्णिमा उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
पहाटे साडेपाच वाजता श्रीसाईबाबांची काकड आरती नंतर श्रींचे मंगल स्नान झाले.
उत्सवाचे सांगतेच्या दिवशी आर्किटेक श्री सुभाष दळी विश्वस्त यांचे हस्ते साईबाबांची पाद्य पूजा करण्यात आली व प.पू.श्रीसाईबाबांना महाभिषेक करण्यात आला. सकाळी दहा ते बारा या वेळेत श्री ह भ प भालचंद्र सरदेशपांडे यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर साई भक्तांनी कीर्तनामध्ये फुगड्या सादर केल्या यात वय वर्ष नव्वद असलेल्या परम साई भक्त श्रीमती इंदिरा कुलकर्णी यांनी फुगडी मध्ये सहभाग घेऊन कीर्तनकार श्री ह भ प भालचंद्र सरदेशपांडे यांचा सोबत फुगडी सादर केली. त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाला, नंतर श्रींची महाआरती व नंतर महाप्रसाद झाला. श्री गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त स्वामी केशव देव गिरी महाराज ढालेगाव यांनी उपस्थिती लावली होती तसेच या कार्यक्रमासाठी परम साई भक्त श्रीमती इंदिरा कुलकर्णी, श्री राजेंद्र कुलकर्णी, सौ सविता कुलकर्णी, श्री ओंकार संसारी श्री विजय पितळे, सौ वृषाली पितळे, श्री नागेंद्र आनंतवार, श्री राजू पातुरकर तसेच दिल्ली, नाशिक, मुंबई, व औरंगाबाद आणि इतर साईभक्त उपस्थित होते. सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी राम रक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र व नंतर धुपारती होईल, सायंकाळी सात वाजता श्रींची पालखी निघेल. सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत प्रसिद्ध भारुडकार श्री ह भ प त्रिंबक महाराज आमले यांचा सांप्रदायिक भारुडाचा कार्यक्रम होईल. रात्री नऊ वाजता शेजारती होईल.
अशी माहिती मंदिर प्रमुख सौ छाया ताई कुलकर्णी यांनी दिली.