ताज्या घडामोडी

कोरपना तालुक्यातील अवैद्य रेती तस्करी प्रकरणी चोरट्यांना मदत करून -शासनाच्या महसूल बुडविणां-या महसूल अधिकारी व खनिकर्म विभागातील फिरत्या पथकाच्या अधिका-यांवर कारवाई करा- :विजय ठाकरेंची मागणी

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्याच्या काेरपना तालुक्यात रात्रीचा फायदा घेत अवैध रेती तस्करी माेठ्या प्रमाणात सुरु असल्याचे बाेलल्या जाते या तालुक्यात फिरते पथक नेमले जरी असले तरी त्यांचे कडून अवैध रेती तस्करी प्रकरणात या तालुक्यातील गावात माेठ्या प्रमाणात कारवाया हाेत नसल्याचे एकंदरीत दिसून येते .
दरम्यान या भागातील एका प्रकरणाच्या बाबतीत विजय ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना रितसर लेखी तक्रार नाेंदवून निपक्ष चाैकशीची मागणी करीत दाेषी अधिका-यांवर कारवाई करण्यांची मागणी नुकतीच केली आहे .या बाबत त्यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर केले त्यात त्यांनी म्हटले की
दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी मौझा नांदाफाटा तलाठी साझा नांदा तालुका कोरपना येथे वाहन क्रमांक MH40N5053 वाहन मालक राहणार राजुरा यांनी त्यांचे १० चक्का हायवा ट्रक ने ५ ब्रॉस रेती eTP ने नेत असता दिलेल्या पत्यावर न नेता ती अन्य ठिकाणी खाली केली .सदरहु रेती नेण्यासाठी आंबेजोगाई जिल्हा बिड येथील लोकेशन दिले हाेते .परंतू ती रेती त्या स्थळी खाली न करता नांदाफाटा येथे लोकल व्यक्तिला विक्री केली .या बाबत तक्रारदाराने
प्रत्यक्षात चौकशी केली असता सदर बाब ही सुनियोजित रेती तस्करी असून त्याबाबत सबळ पुरावे दिसत असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे .
चेक बल्लारपुर येथील बी १ – बी २ नावाने कोडिंग नंबर असलेल्या वाहनातून ही तस्करी होत आहे आणि अतिदुर्गम औद्योगिक कोरपना तालुक्यात रोज शेकडों गाड्या रेतीची तस्करी करून विक्री व साठवणूक केल्या जात आहे .
आंबेजोगाई जिल्हा बिड या जिल्ह्यमध्ये मुबलक प्रमाणात रेतीघाट असताना ते चंद्रपुर जिल्ह्यतून रेती कशाला विकत घेणार आणि जरी ती घेतली तरी ती किती महागात पडेल हा एक महत्वाचा प्रश्न येथे सध्या चर्चिला जात आहेत .
दूर अंतराच्या नावे टीपी बनवून जिल्ह्यातच रेती विक्री करायची व एकाच टीपी वर दिवसभर रेती वाहतुक करायची असा गोरखधंदा सध्या या भागात जाेरात सुरु आहे . हा धंदा त्वरित थांबवावा व दोषी अधिका-यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांचेवर कारवाई करण्यांची मागणी गडचांदूरचे विजय ठाकरे यांनी एका निवेदनातून केली आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close