ताज्या घडामोडी

रेती माफियास राजूरा महसूल पथकाचा परत एक दणका

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गौण खनिजांवर अंकूश व दंडात्मक कारवाई करण्यासाठी या पूर्वीच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना सुचना केल्या आहेत.त्याच अनुषंगाने तहसिलदार यांनी स्वतंत्र महसूल पथक तयार केले आहे.दरम्यान आज राजूरा येथील एका महसूल पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेतीचे एक ट्रॅक्टर जप्त केल्याचे समजते.ही कारवाई मौजा विरुर रेल्वे गेट जवळ केली असून या फिरत्या पथकात प्रामुख्याने मंडळ अधिकारी एस .एम. साळवे, मंडळ अधिकारी निरंजन गोरे तलाठी शेंडे यांचा समावेश होता.सदहु अवैध रेतीचे ट्रॅक्टर पोलिस स्टेशन विरुर येथे लावले आहे.दोन दिवसांपूर्वीच महिला he मंडळ अधिकारी वनिता रामटेके व त्यांच्या पथकातील काही कर्मचा-यांनी अवैध रेतीचे दोन वाहने तहसिल कार्यालयात जमा केली होती.हे येथे उल्लेखनीय आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close