ताज्या घडामोडी

जानाळा येथील भुतेश्वर महादेव मंदिराच्या कंपाऊंडची तोडफोड ; गैरअर्जदारांवर कारवाई करा

लोकहितची चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे मागणी

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जानाळा येथील समाजसेविका मायाताई सुरेशराव कोसरे यांच्या शेतात गेल्या काही वर्षांपासून असलेल्या भूतेश्वर महादेव मंदिराच्या कंपाऊंडची गैर अर्जदार नामे तिरुपती क्रिस्टया कंनकटी व श्रीलता तिरुपती कंनकटी यांनी तोडफोड केली असून या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व.डाॅ.सखाराम कुचीनकर यांच्या कन्येस योग्य न्याय देण्यात यावा अश्या आशयाची मागणी राष्ट्रीय लोकहित सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी चंद्रपुरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे नुकतीच केली आहे.दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा उपराजधानी नागपूरच्या सुपरिचित समाजसेविका मायाताई कोसरे यांनी मूलचे समर्थ यांच्याकडे उपरोक्त प्रकरणात एक लेखी निवेदन सादर केले होते.त्या अनुषंगाने समर्थ यांनी चौकशीची मागणी केली आहे.
चंद्रपूर -मूल मार्गावरील जानाळा येथे मायाताई कोसरे यांची शेतजमीन होती त्यांनी ती जमीन भंडा-याचे रहिवाशी तिरुपती कंनकटी व श्रीलता कंनकटी यांना (मायाताई यांनी )विकली.विक्रीपत्र झाल्या नंतर त्यांनी लगेच गट नं.१०७मध्ये असलेल्या भूतेश्वर महादेव मंदिराचे साक्षदारांसमक्ष १००रुपयाच्या स्टँप पेपर वरती दानपत्र लिहून घेतले.गैर अर्जदारांनी दानपत्र लिहून दिल्या नंतर सुध्दा मायाताई यांच्या अनुपस्थितीत सदरहु मंदिराच्या कंपाऊंडची तोडफोड केली.या बाबत मायाताई कोसरे यांनी मूल पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे.स्वातंत्र्य संग्राम सैनिक
स्व . डॉ.सखाराम कुचिनकर व राष्ट्रीय राष्ट्रसेविका दिवंगत भागीरथीबाई कुचीनकर यांनी दि.31जूलै 1962ला भूतेश्वर महादेव मंदिर स्वमालकीच्या शेत जमीनीत उभे केले होते.या मंदिरात महाशिवरात्री उत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे केल्या जातात.परंतु गैरअर्जदारांनी मंदिराच्या कंपाऊंडची तोडफोड केल्यामुळे साहजिकच कोसरे परिवारातील सदस्यगणांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
समाजसेविका मायाताई कोसरे यांनी संपूर्ण पुराव्यासह दत्तात्रय समर्थ यांना माहिती देताच त्यांनी या बाबतीत चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक लेखी निवेदन सादर केले.निवेदन देतांना चंद्रपूर लोकहितच्य शहराध्यक्ष अंजली इटनकर, कविता दिकोंडवार, जेष्ठ समाजसेवक पुंडलिक गोठे, आयटकचे प्रकाश रेड्डी, अर्चना ठाकरे, कु . स्नेहा मडावी, गीता सलामे,वैष्णवी गेडाम व अन्य पदाधिकारी व सदस्यगण या वेळी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close