युवा सेना पाथरी तालुका प्रमुख पदी संतोष गलबे यांची नियुक्ती
जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील संतोष गलबे यांची युवा सेनेच्या पाथरी तालुका प्रमुखपदी नियुक्ति करण्यात आली आहे .पाथरी येथील शिवसेना भवन येथे पदनिवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास
शिवसेनेच्या उपनेत्या सौ . आशाताई विचारे व शिवसेनेचे पक्ष निरीक्षक सुभाष जी सोळुंके तसेच शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान आदी मान्यवर ऊपस्थीत होते .यावेळी संतोष गलबे यांची युवा सेनेच्या पाथरी तालुकाप्रमुख पदी नीवड करण्यात आली .शिवसेनेच्या उपनेत्या सौ.आशाताई विचारे , शिवसेनेचे पक्ष निरीक्षक सुभाषजी सोंळुके ,शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन पाथरी येथे संतोष गलबे यांना युवा सेनेच्या पाथरी तालुका प्रमुख या पदाची नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अमोल भालेपाटील,विधानसभा प्रमुख एकनाथ उर्फ पपू भैया घाडगे , सर्जेराव भाऊ गिराम, मधुकर नाना निरपने , वैजनाथ कोल्हे, आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. या निवडीबद्दल तालुक्यात अभिनंदन होत आहे .
पुढील कार्यास व पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या विधानसभेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या.