ताज्या घडामोडी

श्री साईबाबा जन्मस्थान मंदिराच्या प्रशासनाने भामट्यास शिताफीने पकडले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

श्री दिलीप देशमुख/खराडे यांनी दिनांक. 15 ऑगस्ट 2021 रोजी. शेतीमाल व्यवस्थापन आणि व्यवसायाच्या संधी या विषयावर शिवाजी महाविद्यालय परभणीच्या सांस्कृतिक सभागृहात मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. दिनांक 21 ऑक्टोबर 2021 रोजी अॅड. मुकुंदराव चौधरी, कार्यकारी अधिकारी श्री साई स्मारक समिती, पाथरी व डॉक्टर विवेक कुलकर्णी दैठणकर पॅथॉलॉजिस्ट परभणी यांच्या समवेत साईबाबांच्या दर्शनासाठी पाथरी जिल्हा परभणी येथे आले होते.

त्यांनी त्यांची ओळख वित्तीय सल्लागार म्हणून केली ते सॅमसंग मोबाईल कंपनीचे आर्थिक सल्लागार आहेत कंपनीकडून दीपावलीला त्यांना फॅक्टरी कास्टमध्ये 60% डिस्काउंट वर दहा मोबाईल मिळतात ते मी जवळच्या व्यक्तींना त्या किमतीत देत असतो असे सांगितले. त्यावरून साईमंदिरात देणगी देण्यासाठी मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नारायण केशव कुलकर्णी यांनी त्यांना एका मोबाईल साठी रु. 22000 असे दोन मोबाईल साठी रु. 44000 गुगल पे द्वारे पाठवले. दरम्यानच्या काळात दिलीप देशमुख / खराडे / लफंगा भामटा असल्याचे मंदिर प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनी इतरही काही जणांची फसवणूक केल्याचे समजले.
दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी प.पू. श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी अॅड. अतुल दि. चौधरी सचिव तथा कार्यकारी विश्वस्त श्रीसाई स्मारक समिती, पाथरी आले असता त्यांना अॅड. मुकुंदराव चौधरी कार्यकारी अधिकारी , अॅड. श्रीपाद कोन्त, भालचंद्र दिवान उर्फ बंडू मामा यांनी शिताफीने दिलीप देशमुख / खराडे यांना पोलीसांच्या ताब्यात दिले व दिलीप देशमुख / खराडे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी ना.के. कुलकर्णी यांनी रितसर तक्रार नोंदविली. या कामी पाथरी पोलिस स्टेशनचे श्री वसंतराव चव्हाण पोलीस निरीक्षक तसेच पोलीस स्टेशनच्या सर्व संबंधित स्टाफने उत्तम सहकार्य केले. अधिक तपास एपीआय बंदखडके व रामेश्वर घुगे करत असल्याचे समजले. श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर प्रशासनामुळे एक भामटा पकडला गेल्याने आणखी काही नागरिकांची फसवणूक होण्याचे टळले त्यामुळे सर्वत्र श्रीसाईबाबा मंदिर प्रशासनाची प्रशंसा होत आहे . आर्थिक फसवणूक होण्याची टळल्यामुळे काही व्यक्तींनी अॅड. मुकुंदराव चौधरी कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले. याकामी श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरच्या मंदिर अधीक्षक सौ छाया कुलकर्णी व अस्थायी सेवेकरी प्रभाकर पाटील, बालाजी बेदरे, अजय पाथरीकर, योगेश इनामदार, सुजाता डहाळे, शिवकन्या नागठाणे, कलाबाई कांबळे, कमलबाई तेलंगे, अण्णा कांबळे इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले. अशी माहिती श्रीसाई स्मारक समितीचे प्रताप आम्ले यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close