असाहय जिवन जगण्यापेक्षा स्वयंप्रकाशित व्हा – मा. अनिल मोरे (माजी सहसचिव मंत्रालय तथा सिने अभिनेते)

असाहय जिवन जगण्यापेक्षा स्वयंप्रकाशित व्हा – मा. अनिल मोरे (माजी सहसचिव मंत्रालय तथा सिने अभिनेते)
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शुक्रवार रोजी संभाजी ब्रिगेड व आधार कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरातील प्रज्ञा प्रतिभावंताचा परभणी गौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध सामाजिक कार्यात कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोहळ्यात बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की सध्या वाचन संस्कृती लोप पावली असून व्यक्ती मोबाईलच्या खूप आहारी गेला आहे त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने 2025 पर्यंत मोबाईल अतिरिक्त वापरामुळे मृत्त होणाऱ्यांची संख्या इतर रोगाच्या तुलनेत अधिक आहे असे सांगितले.त्याग समर्पण प्रयत्नांची पराकाष्टा याशिवाय जीवनाचा सुखकर मार्ग सापडत नाही असे विधान त्यांनी केले. माननीय रोहन रुमाले साहेब यांनी विद्यार्थ्यांना युवकांना शिक्षणाशिवाय क्रांती होत नाही त्यामुळे शिक्षण घ्या असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अनिलजी मोरे (मा. सहसचिव मंत्रालय, तथा सिनेअभीनेते ),कार्यक्रमाचे उदघाटक,मा.रोहणजी रुमाले (सहाय्यक कामगार आयुक्त, मुंबई ),मा.श्री.शिवानंद टाकसाळे (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद) डॉ. सुहास जगताप (जिल्हा शल्य चिकित्सक) विठ्ठलजी भुसारे (शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, परभणी ),श्री.नितीनरावजी देशमुख (विभागीय कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठवाडा ), मा. अनिताताई सरोदे (अध्यक्ष, दक्षता समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी तथा रुग्णहक्क संरक्षण महिला जिल्हाध्यक्ष, परभणी ), मा. बालाजी मोहिते (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, परभणी ), मा. गजानन जोगदंड (महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, परभणी ) यांच्यासह ईतर मान्यवरांच्या हस्ते परभणी गौरव सोहळ्यात विवीध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मा.सुरेश हिवराळे, प्रा.सरस्वती ताई दलवे, ज्ञानेश्वर बर्वे,विठ्ठल कांगणे, ए व्ही मनव्हवतकर,पांडुरंग अंभोरे, आशा खिल्लारे,पंकज देशमुख,किशोर रनेर,गंगासागर मोरे,कांचन करेगवकर बालाजी लांडगे,मुगाजि बुरूड,प्रताप देशमुख,पैठणकर व्यक्तींचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगद गरुड यांनी केले.तर आभार गोविंद इकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड व आधार कामगार युनियन चे जयश्री ताई पुंडगे,मंगेश भरकड , श्रीकांत सुपरणीस,नितीन जाधव,माऊली हिंगे, प्रसाद देवके, कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.