दिव्यांगाना अंतोदय यादीत समाविष्ट करा – भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटने ची मागणी
पोभूर्णा येथील तहसिलदार याना निवेदन द्वारे मागनी
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना हि एकमेव संघटना म्हणून जनमानसात रूजत आहे. दिव्यागांवर होणारया अन्यायाविरुद्ध ,न्याय- हक्कासाठी,सतत लढा देत आहे.दिव्यागाना अंत्योदय यादीत समाविष्ट करून योजनेचा लाभ मिळावा यासाठी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना वारंवार लढा देत आहे.शासन निर्णयानुसार दिव्याग व्यक्तींना अंत्योदय यादीमध्ये समाविष्ट करून त्वरित अन्नशिधापञिका उपलब्ध करून द्या अशी मागणी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना तालुका पोंभुर्णा तर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली.
शासन निर्णय हे फक्त कागदोपत्रीच रंगवल्या जाते.माञ त्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचत नाही.दिव्याना लाभ मिळाला नाही तर भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करू असा इशारा भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष रफीक कुरेशी , तालुका सचिव अविशांत अल्गमवार यांनी दिला.
यावेळी निवेदन देताना नवनाथ पिपरे , सौ. अरुणा अल्लीवार, सौ. शारदा मोगरकार , राजेश्वर पातढे , विट्ठल वासेकर , राजन गुरुनुले , फिरोज पठान , भीमराव मानकर , दुर्योधन ढोले, अंकुश लिंगलवार, प्रफुल ढोडरे, शुभम धोढरे, संतोष सतपुते , ताराबाई उराडे उपस्थित होते