भंडारा जिल्हा परिषद निवडणूक सोडत
नागरिकांचा मागासवर्गामधील महिला तसेच सर्वसाधारण महिला.
सुधारीत आरक्षण सोडत सभा 25 नोव्हेंबर रोजी .
प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा, दि. 23 : राज्य निवडणूक आयोग दिनांक 23 नोव्हेंबर 2021 चे सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद भंडारा निवडणूक विभागामधील नागरिकांचा मागासवर्गामधील महिला तसेच सर्वसाधारण महिलांकरीता पुन्हा सोडत पध्दतीने आरक्षणाची कार्यवाही करण्याकरीता 25 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची/ नागरिकांची सदर विशेष सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर रहावे. कोविड-19 साथीच्या आजाराचे अनुषंगाने विशेष सभेच्या स्थळी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक 8 नोव्हेंबर 2021 च्या पत्रातील निर्देशानुसार मा. उच्च न्यायालय, औंरगाबाद खंडपीठात दाखल रिट याचिकेव्दारे शासनाने दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी पारीत केलेला महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3/2021 ला आव्हान देण्यात आले असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण उक्त नमुद याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.
आरक्षण सोडतबाबत असा राहील कार्यक्रम नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला तसेच सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याचा दिनांक 24 नोव्हेंबर 2021 (जिल्हाधिकारी) तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षण सोडत काढण्याचा दिनांक 25 नोव्हेंबर 2021 (जिल्हाधिकारी) तर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याचा दिनांक 26 नोव्हेंबर 2021 आहे.