वेलकम कॉलनी रहिवाशी यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद चिमूर यांना कॉलनीतील समस्ये बाबत दिले निवेदन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
गेल्या 20 ते 22 वर्ष्यापासून वेलकम कॉलनी चिमूर येथील रहिवासी वास्तव्य करीत आहेत. चिमूर मधील सर्वात पहिली व जुनी वस्ती म्हणून सुद्धा वेलकम कॉलनी ( हजारी मोहल्ला ) ची एक चिमूर मध्ये वेगळी ओळख आहे. असे असतांना सुद्धा या कॉलोनी मध्ये सिमेंट रोड , सिमेंट नाली तसेच महत्वाच्या ईतर सोई-सुविधांचा अभाव बघावयास मिळत आहे.
5 वर्ष्याच्या अगोदर चिमूर मध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात होती तेव्हा वेलकम कॉलनी येथील रहिवासी यांनी कॉलनीतील मुख्य रस्ते, सांडपाणी वाहून नेण्यासाठी सिमेंट कोंक्रेट नाली तसेच ईतर सोई- सुविधा यांचा अभाव व कमतरता असून रहिवाशी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. करिता समस्या सोडविण्यात यावी याबाबत बरेचदा निवेदने दिलीत परंतु कोणीही लोकप्रतिनिधींनी तसेच प्रशासकीय यंत्रणा यांनी समस्या लक्षात घेऊन लक्ष दिले नाही. तसेच तत्कालीन काही ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच 5 ते 6 वर्षाचे आधी नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषद येथील पदाधिकारी यांनी हेतुपुरस्सपर पणाने या समस्सेकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणा केल्याचा आरोप या वेलकम कॉलनीतील नागरिकांचा आहे.या कॉलोनी मध्ये सिमेंट रोड व नाल्या नसल्याने कच्च्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरातील सांडपाणी हे रोडवरून बारमाही वाहत असते व त्यामुळे कॉलनीतील कच्च्या रोड ला मोठं-मोठे खड्डे पडले असून त्या खड्यांमध्ये नेहमी पाणी साचून असते त्या खड्यातील साठवलेल्या पाण्याने घाणीचे साम्राज्य त्या ठिकाणी बघावयास मिळत आहे. तसेच त्या साठवलेल्या पाण्यातुन मच्छरांची पैदास होत असून या कॉलोनीतील लोकांना या कोरोना महामारी मध्ये पाण्यापासून निर्माण होणाऱ्या रोगाची निर्मिती होऊ शकते आणि यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरातील वाहत्या पाण्यामुळे पडलेल्या खड्यांमुळे येथील रहिवाश्यांना येण्या-जाण्यास कोणत्याही प्रकारची वाहतूक करण्यास खूप अडचण निर्माण होत असून कित्येकदा लहान मुलांचा खड्यात तोल जाऊन जिवित हानी होण्यापासून बचावले आहेत. तसेच बैलगाडी, ट्रॅक्टर, आटो अश्या कोणत्याही वाहनाला रस्त्याने धावणे धोक्याचे असून वाहनांची पण नुकसान झालेली आहे असे येथील रहिवाशी जनतेचे मत आहे.
एवढी गंभीर समस्या असून सुद्धा प्रशासनाचे व तत्कालीन नगर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
त्याचप्रमाणे या वेलकम कॉलनी चिमूर येथे बऱ्याच प्रमाणात कर्मचारी तसेच अधीकारी वर्ग राहत असून काही गरीब कुटुंब रहिवाशी आहेत. रहिवाशी असणारे सर्व नागरिक आधी ग्रामपंचायत व आत्ता सध्या 5 ते 6 वर्षांपासून स्थापन झालेल्या नगरपरिषदचा सर्व प्रकारचा कर हा नियमित भरणा करीत असून सुद्धा ही अपुऱ्या महत्वाच्या सोई-सुविधांची कमी या वेलकम कॉलोनी चिमूर मध्ये बघावयास मिळत आहे.
वारंवार ही समस्या 5 वर्षाचे आधी म्हणजेच 20 ते 22 वर्षाचे अगोदर ग्रामपंचायत चिमूर तसेच आत्ता नगरपरिषद झाल्यापासून नगरपरिषद चिमूर यांना समस्सेबद्दल अनेकदा निवेदने देऊन सुद्धा कॉलोनीतील जनतेचा प्रश्न सुटत नाही हे बघता हताश होऊन वेलकम कॉलनी येथील रहिवासी यांनी जनसामान्य जनतेचे कार्यकर्ता श्री. प्रशांतभाऊ डवले, अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी तथा उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संघठन चिमूर यांचे कडे धाव घेतली. त्यांच्या माध्यमातून वेलकम कॉलनी येथील नागरिक समस्या सोडविण्यासाठी विनंती अर्ज/निवेदन घेऊन गेले असता लगेच दखल घेऊन त्याच नागरिकांसोबत प्रशांतभाऊ हे मोक्यावर जाऊन पाहणी केली व या समस्येबद्दल सविस्तर जाणून घेतले.
मोक्यावर जाऊन पाहणी केली असता वेलकम कॉलनी येथील समस्सेची स्थिती खूप वाईट अशी पहावयास मिळाली. कोरोना महामारीची परिस्थिती बघता त्यांनी जराही वेळ न करता कॉलोनीतील नागरिकांशी चर्चा करून समस्या पूर्णपणे जाणून घेऊन कॉलनीतील काही प्रतिनिधी म्हणून नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषद गाठली व नगरपरिषद येथील नव्यानेच नियुक्त झालेले मुख्यधिकारी भोयर साहेब यांना आज दिनांक 24 में 2021 रोज सोमवारला समस्या बाबतचे निवेदन दिले.तसेच कॉलोनीतील समस्येबाबत संपूर्ण स्वरूप व गांभीर्य मुख्याधिकारी साहेब यांच्या समोर मांडून सविस्तर चर्चा केली.
चर्चेअंती माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेता व पावसाळा ऋतुचे आगमन होण्याअगोदर तात्पुरत्या स्वरूपाची काहीतरी उपाययोजना करू तसेच सिमेंट नाली बांधकाम तसेच सिमेंट रोड बांधकाम मंजूर करण्यासाठी प्रस्थाव बनवू असे सकारात्मक उत्तर दिले. आणि वेलकम कॉलोनी मधील समस्या लवकरात-लवकर मार्गी लावू असा शब्द मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद चिमूर यांनी प्रशांतभाऊ तसेच वेलकम कॉलोनीतील नागरिकांसमोर दिला.
समस्येविषयी सकारात्म उत्तर ऐकून वेलकम कॉलोनी चिमूर येथील नागरिकांच्या मनाला 22 वर्षानंतर दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रशांतभाऊ यांनी वेळात-वेळ काढून समस्सेची दखल घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल वेलकम कॉलोनी चिमूर येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले. निवेदन देतांना श्री.चंद्रशेखर सुधाकर गोहणे, श्री.कवडुजी फागोजी खडसंग, श्री. विजय तुकाराम निवटे, श्री. कुणाल कवडुजी खडसंग आणि कॉलॉनीतील नागरीक उपस्थित होते.