ताज्या घडामोडी

अनावश्यक खर्च टाळुन,शाळेतील क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरीय व विभाग स्तरावर निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देवुन वाढदिवस केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

तालुक्यातील पोहेटाकळी येथील चिरंजीव सार्थक लक्ष्मण उजगरे या विद्यार्थ्यांने व त्यांचा पालकांनी अनावश्यक खर्च टाळुन वाढदिवसाच्या निमित्ताने पोहेटाकळी येथील जिल्हा तसेच विभागीय स्तरावर क्रिडा स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देवुन व जाहीर सत्कार करुन वाढदीवस केला साजरा.
सविस्तर बातमी अशी की दिनांक 14 डिसेंबर बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहेटाकळी येथिल विद्यार्थी सार्थक लक्ष्मण उजगरे या विद्यार्थ्यांने व त्यांचा पालकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची क्रिडा स्पर्धेत जिल्हा व विभागीय स्तरावर निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देवुन व त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन वाढदिवस केला साजरा.
यावेळी कार्यक्रमाला प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रल्हाद चोरमारे,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मुरलीधर गोंगे,शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश अंभुरे,जेष्ठ नागरिक प्रकाश बापु उजगरे, अॅपेक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक अनिल उजगरे,गावचे ग्रामसेवक आझमखान पठाण, माणिक गोंगे सार्थकचे पालक लक्ष्मण उजगरे, संघप्रिया उजगरे,पल्लवी उजगरे,शाळेतील शिक्षीका प्रतिमा पानझाडे,अजित खारकर,रतन कदम,श्रिकांत मिसे,अशोक गोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रल्हाद चोरमारे व अनिल उजगरे,प्रकाश बापु उजगरे यांनी चिरंजीव सार्थक लक्ष्मण उजगरे ला वाढदिवसाच्या निमित्ताने सुभेच्छा देत सार्थक लक्ष्मण उजगरे व त्यांच्या पालकांनी वाढदीवसाचा अनावश्यक खर्च टाळुन क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावर आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन वाढदिवस साजरा केल्याचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दील्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close