42रक्तदात्यांचे रक्तदान!नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने रक्तदान शिबिराचे चंद्रपूरात आयोजन
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर व बल्हारपूर नॅशनल रेल्वे मजदूर यु तज्ञनियनच्या वतीने आज शनिवारला स्थानिक रेल्वे स्टेशन परिसरात एका रक्तदान शिबिराचे सकाळी ८वाजता आयोजन करण्यात आले होते. आयोजित रक्तदान शिबीरात 42रक्तदानदात्यांनी सहभागी होवून स्वयंस्फूर्तिने रक्तदान केले.या वेळी नागपूर येथील जीवन ज्योति ब्लड बँकची संपूर्ण टीम उपस्थित होती . सदरहु शिबिर यशस्वी करण्यासाठी एम .वेंकटेशवरलू, कृष्णकुमार सेन ,मनोज पाटील,अन्नम वेंकटेशवरलू, प्रियंका भूते , दीनानाथ मंडल, युवराज बारंगे, विरेंद्र सिंह , घनश्याम तुरले,विजय वानखेडे,आशिष लेडांगे,पी.पी.बोरकर , संतोष वाजपेयी,पी.राजकुमार ,एस .के.झा स्वप्निल वालदे , कल्पना नेवारे ,लक्ष्मण रणविर,व विनोद लभाने यांनी अथक परिश्रम घेतले.दरवर्षि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते असे मनोज पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना या वेळी सांगितले.