ताज्या घडामोडी

अभाविप वरोरा शाखेचा छात्रनेता संमेलन उत्साहात संपन्न

अभाविप वरोरा शाखेची नूतन कार्यकारिणी घोषित .

अभाविप वरोरा नगर अध्यक्ष म्हणून प्रा. गुरुदेव जुमडे व नगर मंत्री म्हणून गौरी येळणे ची निवड .

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून देशभरात काम करत असते. विविध सामाजिक उपक्रम, आंदोलन, सामाजिक कार्य या माध्यमातून अभाविप चे काम अविरत चालू असते. यांचाच एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वकृत्व, कर्तुत्व, नेतृत्व, असे तीनही गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजू झाले पाहिजे यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदा ही छात्रनेता संमेलनाचे आयोजन स्थानिक लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे करण्यात आले होते. या मध्ये कार्यक्रमाचे अतिथी म्हणून बाबा भागडे यांची उपस्थिती होती तर निवडणूक अधिकारी म्हणून डॉ.सागर वझे व प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविप चंद्रपूर जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार हे उपस्थित होते. त्यांनी अभाविपची भूमिका हा विषय मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका आगलावे हिने केले. व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शकिल शेख यांनी केले. त्यानंतर अभाविपच्या वर्षभरातील कार्यक्रम उपक्रम यांची मांडणी लोकेश रुयारकर यांनी केली व जुनी नगर कार्यकारणी विसर्जित करून निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते नूतन नगर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या मध्ये नगर अध्यक्ष म्हणून प्रा.गुरुदेव जुमडे यांची निवड करण्यात आली. व उपाध्यक्ष म्हणून प्रा.सीमा सोनटक्के/बोभाटे तर नगर मंत्री म्हणून गौरी येळणे ची निवड करण्यात आली. नगर सहमंत्री – वैष्णवी आगलावे, लोकेश रुयारकर,
महाविद्यालय प्रमुख – कुणाल दातारकर, महाविद्यालय सहप्रमुख – महेश सोनवाणे, सोनाक्षी हरबडे
TSVK प्रमुख – लोकेश घाटे,
सेवाकार्य प्रमुख ( SFS ) – दीपिका आगलावे, सेवाकार्य सहप्रमुख ( SFS ) – प्राची खोके, विकासार्थ विद्यार्थी प्रमुख ( SFD ) – मोनिका टिपले, विकासार्थ विद्यार्थी सह प्रमुख ( SFD ) – निकिता शेंडे,
कला मंच प्रमुख – मयुरी खोंडे, कला मंच सह प्रमुख – साक्षी जीवतोडे, ज्ञानेश्वरी हिवरे, मानसी गमे, सोशल मीडिया प्रमुख – नंदिनी पोटे, सोशल मीडिया सहप्रमुख – आशिष भट, कोष प्रमुख – सृष्टी निमजे, कार्यालय प्रमुख – रवी शर्मा, कार्यालय सह प्रमुख – रक्षा काळे
स्वाध्याय मंडळ प्रमुख – मानसी खोंडे
स्वाध्याय मंडळ सह प्रमुख – फकिरा निखाडे, खेल कार्य प्रमुख – प्रज्वल कुमरे, खेल कार्य सहप्रमुख – अलिशा शेख,
सदस्य – प्रा. धनंजय पारके, गणेश नक्षिणे, शकिल शेख, छकुली पोटे, कुणाल आसुटकर, वैष्णवी बन, साक्षी काळे, तृप्ती वाढई, स्नेहल ढोबे, शक्ती केराम, अमित पटले, शैलेश दिंडेवार, जयेश भडगरे, आदींची घोषणा करण्यात आली. या नूतन कार्यकारणीचा सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close