ताज्या घडामोडी

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा केला पाहणी दौरा

सोबत तहसीलदार,गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

दिनांक 08 सप्टें. रोजी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी प्रशासकीय अधिकारी तहसीलदार,गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची व नुकसान झालेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी केली.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील काही दिवसात गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड,पालम व पूर्णा तालुक्यात सततच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने अनेक भागातील शेतकऱ्यांची पिके व जनावरे पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याने शेतकरी निसर्गापुढे हतबल झाला असल्याने मागील दोन चार दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानी सह इतर मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी नुकसानग्रस्त भागात तहसीलदार,गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्यासाठी प्रशासनास सूचना दिल्या आहेत.नुकसान झालेल्या लाभार्थ्यास तात्काळ मदत करण्यास ही आवर्जून सांगितले आहे आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची सुरुवात गंगाखेड शहरातील रजा कॉलनी,रमाबाई नगर,आजाद नगर,बरकत नगर, येथून सुरुवात होऊन नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्य पाण्यासोबत वाहून गेल्याने सदरील नागरिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले तसेच मालेवाडी येथील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पालम तालुक्यातील वहिनी या गावाची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाणी सुद्धा केली. सरसकट पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. व पालम येथे तहसील कार्यालय येथे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांची विचारपूस करत सरसगट पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या सोबत गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ,पालम तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे,गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,पालम-पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड,गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे,जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव मुरकुटे, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आळनुरे,गंगाखेड तालुका अध्यक्ष शिवाजी पवार,संजय काळे, नगरसेवक सत्यपाल साळवे, शहराध्यक्ष शेख खालिद भाई, इक्बाल जाऊस,राजू अहमद खान इंतेसार सिद्दिकी, आकाश मोठे,नारायण (तात्या) दुधाटे, गणेश गणेशरावघोरपडे,भगवान शिरस्कर,बालासाहेब कुरे,विजय शिंदे,राहुल शिंदे,बाबासाहेब इंगडे इतर कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close