ताज्या घडामोडी

चंद्रपूर महसूल पथकाची धडक कारवाई ; अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले

जिल्ह्यात चंद्रपूर तहसिल कार्यालय पथकाची कामगिरी विशेष उल्लेखनीय

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीला अवैध रेती चोरुन नेण्याचे प्रमाण जरी अधिक वाढले असले तरी महसूल विभागातील काही प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ महसूल अधिकारी व कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे अवैध गौण खनिजाची वाहने पकडत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल विभागात चंद्रपूर महसूल विभागाची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असल्याचे आजपावेतो अवैध गौण वाहनांवर झालेल्या दंडात्मक कारवायांवरुन एकंदरीत दिसून येते .याच जिल्ह्यात सर्वात कमी कारवाया जिवती तालुक्यात असल्याचे विश्वसनिय सुत्राने या प्रतिनिधीस सांगितले.
दरम्यान आजपावेतो जिल्ह्यात महसूल विभागात उत्तम व उल्लेखनीय कामगिरी असणाऱ्या चंद्रपूर महसूल विभागाच्या एका पथकाने आज गुरुवारी मौजा वढा येथून ट्रॅक्टर ने अवैध रेती नेत असताना शेणगांव येथे पथकाने मोठ्या शिताफीने ते वाहन पकडले.सदरहु वाहन चालकाजवळ कुठल्याही प्रकारची रेती नेण्याची परवानगी नव्हती.अवैध रित्या वाहनचालक रेती नेत असल्याचे लक्षात येताच चंद्रपूर तहसिल कार्यालयाचे नायब तहसीलदार डॉ.सचिन खंडाळे, घूग्घूसचे मंडळ अधिकारी किशोर नवले, मंडळ अधिकारी किरण मोडकवार , तलाठी राहुल भोंगळे, शैलेश दुवावार , मनोज शेंडे व महसूल पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अवैध रेतीचे ते ट्रॅक्टर पकडले.सदरहु ट्रॅक्टर सध्या घूग्घूस तलाठी कार्यालयात दंडात्मक कारवाई करण्यासाठी जमा करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या अगोदर घूग्घूसचे मंडळ अधिकारी व पटवारी कांबळे यांनी मध्यरात्री जिवधोक्यात टाकून अवैध रेतीचे वाहन पकडले होते.
चंद्रपूरातही सर्रास अवैध रेतीची वाहतूक होत असल्याचे बोलल्या जात आहे.या महसूल पथकाने या कडेही जातीने लक्ष पुरविणे तेव्हढेच गरजेचे आहे . तरंच ख-या अर्थाने काही अंशी चंद्रपूर शहरातील अवैध रेती चोरीवर अंकुश लावता येईल.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close