फिस्कुटी येथे स्मार्ट ग्राम संदर्भात आढावा सभा
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
23 फरवरी 2021 ला मुल तालुक्यातील मौजा फिस्कुटी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात 4 वाजता स्मार्ट ग्राम संदर्भात आढावा व मार्गदर्शन सभा घेण्यात आली.
मा. डॉ. मयुर कळसे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल यांनी स्मार्ट ग्राम संदर्भातील अटी व शर्ती चे मार्गदर्शन केले .
सदर कार्यक्रमाला माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संध्याताई गुरनुले उपस्थित होत्या. आढावा सभेमध्ये स्मार्ट ग्राम करण्याकरता विभागनिहाय आढावा घेण्यात आला व सदर विभागाकडून काय करता येईल या संदर्भात आढावा घेतला या सभेस पंचायत समिती स्तरावरील कृषी विभाग, पंचायत विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण विभाग, उमेद विभाग, व इतर विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
मा. जिल्हा परिषद अध्यक्ष मौजा फिस्कुटी गावाकरीता 30 लाख रुपये मंजूर करणार आहेत या निधीमधून सोलर ऊर्जा , बंदिस्त गटारे, वृक्षलागवड, वैयक्तिक नळजोडणी, सार्वजनिक शौचालय निर्मिती करन्यात येणार आहेत तसेच उमेद अभियानाच्या माध्यमातून आठवड्यातून एक दिवस ग्रामस्वच्छता केली जाणार आहे.
या कार्यक्रमाला मा. जि. प. अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, मा. डॉ. मयूर कळसे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल, मा. नितीन गुरुनुले सरपंच ग्रामपंचायत फिस्कूटी, मा.राकेश गिरडकर उपसरपंच ग्रामपंचायत फिस्कुटी उपस्थित होते.