ताज्या घडामोडी
भारतीय संविधान दिन आणि पोलीस मित्र परिवार समिती स्थापना दिनाच्या निमित्ताने दिव्यांगांना अन्यधान्य किट वाटप

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
आज दि 26 नोव्हेंबर 2021 वार शुक्रवारी दुपारी दोन वाजता अंध अपंग अशोक तांगडे आणि पत्नी सुमित्रा तांगडे यांना किट वाटण्यात आले पोलीस मित्र परिवार स समिती स्थापना आणि संविधान दिनाचे औचित्य साधून समाज सेवक , पत्रकार आणि पोलीस मित्र परिवार स समितीचे परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश यु जोशी बाभळगावकर हे सामाजिक कार्यकर्ते असून ते विविध प्रकारचे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करीत असतात यांना समाज सेवेची खूप आवड आहे दुरितांचे तिमिर जाओ या प्रमाणे ते सतत सामाजिक कार्य करतात पत्रकार आणि समाज सेवक महेश यु जोशी बाभळगावकर यांनी आजच्या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन समाज कार्य केले.
