तंमुसने लावला प्रेमीयुगलाचा विवाह
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
नेरी येथून जवळच असलेल्या खुटाळा येथील प्रेमीयुगलाचा तंटामुक्त समिती नेरी ने रितीरिवाजानुसार विवाह लावला.
मौजा खुटाळा येथील दामीना दिवाकर गायकवाड व अमोल तानबाजी चौधरी यांचे एकमेकांवर प्रेम जळले आणि त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. दोघांनीही तंटामुक्त समिती नेरी येथे रितसर अर्ज व कागदपत्रे देऊन विवाह लावून देण्याची विनंती केली त्यानुसार तंटामुक्त समिती अध्यक्ष व सदस्य यांनी कागदपत्रांची पडताळणी व इतर चौकशी करून मीना दिवाकर गायकवाड (वय 23 वर्ष) व अमोल तानबाजी चौधरी (वय 27 वर्षे) यांचे मागील चार वर्षापासून एकमेकावर जिवापाड प्रेम असल्यामुळे रितीरिवाजानुसार लग्न लावून दिले. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष हरिदास चांदेकर, उपसरपंच चंद्रभान कामडी, पोलीस पाटील शुद्धोधन घोनमोडे, माजी पोलीस पाटील शंकर पिसे, माजी अध्यक्ष जीवन वाघे, माजी अध्यक्ष पिंटू खाटीक, सत्यभामा कामडी, गंगाबाई कामडी, माणिकराव नगराळे, रामचंद्र कामडी, संजय नागदेेवते,डॉक्टर रमेश राऊत, मिलिंद जांभुळकर, रुस्तमखा पठाण, पंकज पाकमोडे, अभिजीत कामडी, हरिश्चंद्र बांगडे आणि इतर गावकरी उपस्थित होते.