ताज्या घडामोडी
उक्कलगाव येथील शिवारातील शेतात आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथील शेतकरी भैय्यासाहेब गायकवाड
यांच्या उक्कलगाव शिवारातील गट क्र.८१ येथील
शेता शेजारी अचानक आग लागली व बघता बघता आग यांच्या शेतासह आजु बाजुच्या शेतात पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवाचे नुकसान झाल्याची घटना ( दि.२६ )वार शनिवार रोजी घडली नगरपरिषद अग्नीशमन दलाचे कर्मचारी सय्यद कलीम व कुमावत यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली या आगीत शेतकरी भैय्यासाहेब गायकवाड यांचे शेती उपयोगी साहित्य तसेच पिंकलर चे दोन पाईप व २०० फुट वायर जळाले आहे महसुल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी भैय्यासाहेब गायकवाड यांच्यासह आजु बाजुचे शेतकरी करत आहे.