ताज्या घडामोडी

वादळी वाऱ्याने मोह वृक्ष उन्मळून पडल्याने विट्ठलवाडा-येनबोथला मार्ग बंद

शहर प्रतिनिधी :प्रमोद दुर्गे गोंडपिपरी

गोंडपीपरी- तालुक्यात गुरवारच्या रात्रौ 11 वाजताच्या दरम्यान मेघ गर्जनेसह, विज चमकून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली.
वादळी वाऱ्याने तर अक्षरशः कहर केला .
विट्ठलवाडा -येनबोथला मार्गालगत असलेले मोह वृक्ष वादळ वाऱ्यात उन्मळून रस्त्यावर पडल्याने सदर मार्ग बंद झाला आहे. त्यांमुळे वाहतुकीस अडथडा निर्माण झाला आहे.
गुरवारच्या रात्री सुरु झालेले वादळ पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते. रात्री 11 वाजता पासून तर आतापावेतो वीज पुरवठा अजूनही खंडितच आहे. या वादळात
काहींच्या घरावरील छपरे उडाले तर घरा सभोवताली असणारे लहान मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत.शेतीचा हंगाम सुरु आहे.विट्ठलवाडा येथिल बऱ्याच शेतकऱ्यांची शेती ह्या मार्गावर आहे. शेती कडे जाण्यासाठी ह्याच एकमेव असलेल्या मुख्य मार्गावर वृक्ष पडल्याने सदर मार्ग बंद आहे. त्यामुळे शेती कामाचा खोळंबा झाला व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असल्याने ह्या मार्ग वरील वाहतूक सेवा पूर्वरत सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close