ओला दुष्काळ जाहीर करा व सरसकट विमा जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू नुमान चाऊस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार उडवून सोडला. गेल्या तीन दिवसांच्या कालखंडामध्ये माजलगाव, धारूर, वडवणी, आष्टी, पाटोदा, परळी, अंबाजोगाई, केज, बीड, गेवराईसह आदी तालुक्यांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. शेतातील खरीपाचे पिके अक्षरश: पाण्यात गेले. अशी गंभीर परिस्थिती आणि शेती पिकाचे महाभयंकर नुकसान झाल्यानंतरही शासन-प्रशासन नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत कागदी घोडे नाचवून ऑनलाईनचा डांगोरा पिटवत आहेत. विमा कंपनी नुकसानीबाबत ऑनलाईन फोटो डाऊन लोड करण्याच्या सूचना देत आहे. शेतकरी बांधावर गेला तर विमा कंपनीचे सर्वर डाऊन राहते. यामुळे संतापलेले शेतकरी अशा व्यवस्थेला उद्देशून मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी सरसकट विमा द्या अन्यथा रस्त्यावर उतरू, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत अधिक असे की, परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर् यांचे हाल करून सोडली आहे. तालुक्यातील बहुतांशी मंडळांमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. नद्या नाल्यांचे पाणी शेतात घुसले. सोयाबीन, कापसासह खरीपाचे अन्य पिक अक्षरश: पाण्यात गेले. शेतकर्यांची कधीही न भरून येणारी पिकांची हाणी झाली. हातोंडाला आलेले पीक अक्षरश: उद्ध्वस्त झाले. हे सर्व उघड्या डोळ्याने शेतकरी तर पहातच आहे, गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासन-प्रशासनालाही ते दिसत आहे मात्र शेतकर्यांना आणखी अडचणीत सापडायचे, व त्यांची थट्टा सूरू आहे असे चाऊस यांनी व्यक्त केले. स्वतः ला शेतकऱ्यांचे प्रतिनिधि बोलून मत मागणारे नेते मंडळी व प्रशासनाने विमा कंपनीसह थेट आता शेतकर्यांच्या बांधावर जावं, लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणार्यांनी या गंभीर बाबीची दखल घेत स्वत:हून बांधावर जात स्वत:च्या उपस्थितीत अधिकार्यांसमवेत पंचनामे करावेत अन्यथा आम्हीं रस्त्यावर उतरू, अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी यांनी व्यक्त केली.