निसर्गसहल,वनभोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी(बु) मोठ्या आनंदाने, उत्साहाने पूर्ण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.११/१२/२०२३ वार-सोमवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी(बु)ता.पाथरी या शाळेची निसर्ग सहल गावचे सरपंच सौ. शकुंतलाबाई रामराव मायंदळे श्री दत्तराव मायंदळे( संचालक डी. सी. सी.बँक परभणी) यांच्या शेतात नेण्यात आली. या ठिकाणी सुंदर अशा विविध झाडाझुडपानी नटलेला हिरवागार परिसर, यात प्रामुख्याने चिकू, आंबे यांच्या शेकडो झाडे असलेल्या बागा तसेच शेत तळे याचे मनमोहक दृश्य, नयनरम्य परिसर याने सर्व विद्यार्थी भारावून गेले.सुरुवातीला गावच्या सरपंच सौ. शकुंतलाबाई रामराव मायंदळे यांनी छानशी तयारी करून त्या जणू आमच्या स्वागताची वाटच पाहत होत्या.मुलांसाठी आसनव्यवस्था, मुलांना खाण्यासाठी दोन कॅरेट चिकू, दोन कॅरेट पेरू अशी सोय करून ठेवली. त्यांचे स्वागत करून विविध आनंददायी उपक्रम घेण्यात आले यात गप्पा,गाणी,गोष्टी, खेळ, कबड्डी, कुस्ती, लंगडी, कविता गायन अशा विविध अंगी गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.शिवाय शेततळे पाहणी दौरा सर्वानी सोबत घेऊन विद्यार्थ्यांना घडविला.
दुपारी सन्माननीय सरपंच यांनी रुचकर, स्वाद्दीष्ट, सुगंधी बासमती तांदूळ वापरून तयार केलेला पुलाव मुलांनी अतिशय आनंदाने स्वीकारला.अश्या प्रकारे शाळेची निसर्ग सहल शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष चिंचाणे,श्री वागाळे एन एस,श्री बगाटे एस जी, श्री देवरे ,श्री गायकवाड, श्री सय्यद, श्री शिंदे, श्रीमती पवार तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री अजीम शेख यांच्या प्रयत्नातून पार पडली. या कामी श्री काळे, श्रीमती अन्साबाई यांचे सहकार्य लाभले.