अल्पवयीन दोन मुलांना अज्ञात इसमाने पळवुन नेले
जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मांडवा ता.जिंतूर जिल्हा परभणी येथुन कृष्णा गायकवाड वय १५ वर्ष, जीवन निंबाळकर वय १४ वर्ष यांना दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजण्यासुमारास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने पळवुन नेल्याची फिर्याद मधुकर श्रीरंग गायकवाड यांनी दि.२० जानेवारी रोजी जिंतुर पोलीस ठाण्यात दिली.या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूध्द पळवुन नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडवा ता.जिंतूर जिल्हा परभणी येथे राहणारे मधुकर गायकवाड यांच्या घरी त्याचा मुलगा कृष्णा गायकवाड यास गावातील राहणारा जीवन निंबाळकर हा सकाळी महादेव मंदिराकडे जाऊ म्हणून दोघे बाहेर गेले.मात्र ते संध्याकाळपर्यंत घरी आलेच नाही.त्याचा जिंतूर, भोगाव,पुंगळा तसेच हिवरखेड,भिलज,जुननवाडी, व नातेवाईकाकडे शोध घेतला असता मिळून आले नाही.कृष्णा गायकवाड हा रंगाने सावळा, बांधा सडपातळ,उची पाच फुट ,अंगात बदामी रंगाचा शर्ट व जीन्सची पॅण्ट, जीवन निंबाळकर हा रंगाने सावळा, बांधा मजबूत, उची पाच फुट, अंगात चौकटीचा शर्ट व जिन्सची पॅण्ट यांना अज्ञात कारणावरून अज्ञात इमाने पळवुन नेल्याची तक्रार मधुकर गायकवाड यांने जिंतूर पोलीस ठाण्यात दिली.या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूध्द अल्पवयीन दोन मुलांना पळवुन नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.