ताज्या घडामोडी

काश्मिर मध्ये वाढदिवस साजरा करीत दिला सामाजिक एकोप्याचा संदेश

ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुरानकर खेमजई वरोरा

वरोरा:- केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष, डॉ. अंकुश आगलावे यांची मुलगी धनु हिचा वाढदिवस जम्मु काश्मिर मध्ये साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती व पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधुन छोटया पध्दती वाढदिवस यावेळी काश्मिर मध्ये साजरा करण्यात आला.
काश्मिर मधील मुस्लीम बांधवासोबत वाढदिवस साजरा करीत सामाजिक एकोप्याचा संदेश यावेळी डॉ. आगलावे यांनी दिला. धर्म , जात, पंथ याला महत्व न देता आपण सर्वप्रथम भारतीय आहो असा सार्थ अभिमान सगळया भारतीयानी बाळगावा असे यावेळी सांगितले.
डॉ. आगलावे यांनी वाढदिवसानिमित्त संबोधित करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता व संताचे विचार यावेळी काश्मिर मध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सांगितला .यावेळी डॉ. आगलावे व त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close