ताज्या घडामोडी

जि.प.प्रा.शाळा अंधापुरी येथे “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा संपन्न

जि.प.प्रा.शाळा अंधापुरी येथे”मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समिती आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर व खुली संगीत खुर्ची स्पर्धा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील अंधापुरी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधापुरी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत कु.हर्षदा गोविंद कदम व स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेत चि.धनंजय धम्मानंद शिंदे हे होते तसेच शाळेतील विद्यार्थींनी कु. सायली उमेश शिंदे कु.शिवानी अशोक सक्राते कु.स्वप्नाली कुंडलिक महाडिक कु.ईश्वरी राधाकिशन शेंडगे इत्यादींनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले तसेच गावातील उच्च उच्चशिक्षित विद्यार्थिनी कु. पूजा आरेकर यांच्या भाषणांनी तर सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.माता पालक संघांना रणदिवे सरांनी मार्गदर्शन केले श्री चोरमारे साहेबांनी शाळाव्यवस्थापना विषयी सखोल मार्गदर्शन केले .श्री राठोड साहेबनी “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यी व आणि गावकऱ्यांसोबत हितगुज साधले.त्याच बरोबर विविध कार्यक्रम घेण्यात आले. “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधापुरी व नवजीवन हॉस्पिटल परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले या शिबिरामध्ये अनेक आजारांचे निदान व उपचार करण्यात आले. तसेच शाळेमध्ये गावातील प्रत्येक घटकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थ्यांचे आई वडील व आजी आजोबा यांना कार्यक्रमांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये गावातील अनेक महिलांनी सहभाग घेतला त्यात माया-लकी, सासा- सुनांनी संगीत खुर्ची स्पर्धेचा आनंद घेतला त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पंचायत समिती पाथरी शिक्षण विभागाचे ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी श्री. राठोड साहेब गुंज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. चोरमारे साहेब , गट साधन केंद्र पाथरीचे विषयतज्ञ रणदिवे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्योतीराम गोरे व माजी अध्यक्ष गणेशराव कोल्हे इत्यादींनी सहभाग घेऊन आमचा आनंद द्विगुणीत केला. शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरताटे सर यांच्या समवेत श्रीमती छाया पवार मॅडम श्री. गणेशराव कोल्हे श्री.ज्योतीराम गोरे श्री.प्रदुम्न कोल्हे श्री.मोरेश्वर मोरे श्री.शरद गोरे इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close